नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अँसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली असून अँसिड हल्ल्याद्वारे त्यांना जीवे मारून टाकू अशा आशयाचे पत्र नवनीत राणा यांच्या दिल्लीच्या शासकीय निवासस्थानाव पाठविण्यात आले आहे. नवनीत राणा यांनी हे पत्र शिवसेनेच्या लेटरहेडवर पाठवण्यात आल्याचे म्हटले असल्याचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले आहे. याप्रकरणात नवनीत राणा यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रारही केली आहे.
यामध्ये पती रवी राणा यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नवनीत राणा यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. आठ फेब्रवारी रोजी नवनीत राणा यांनी संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंदर्भात बोलताना जे भाषण दिलेले त्याचा उल्लेख या पत्रात असल्याचे सांगण्यात आले आहे. या भाषणामध्ये नवनीत राणा यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमधील प्रमुख पक्ष असणार्या शिवसेनेवर आणि मुख्यमंत्र्यावर टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नवनीत राणा यांनी नॉर्थ एव्हेन्यू पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. हे पत्र मराठीमधून असल्याचे सांगण्यात आले आहे. पत्राच्या वरच्या भागामध्ये शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे. मात्र पत्रावर कोणाचाही नाव किंवा पत्ता नाही.
Contents
hide
Related Stories
December 8, 2024
December 8, 2024