नांदगाव खंडेश्वर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीनिमित्त युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी युवा सेनेतर्फे भगव्या सप्ताहाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित वनमंत्री संजय राठोड यांनी आगामी नगरपंचायत निवडणुकीत नांदगाव नगरपंचायतवर शिवसेनेची एकहाती सत्ता आल्यास २५ कोटी रुपये विकास निधी देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
हिंदुत्व बाईक रॅलीच्या समारोपीय युवासेना मेळाव्यात ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आयोजित युवा सेनेतर्फे भगव्या सप्ताहाचे कार्यक्रमात २५ जानेवारीला शहरातून ऐतिहासिक बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत हातात भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलेली तरुणाई असे चित्र सोमवारी शहरात पहायला मिळाले. ३00 बाईकवर तरुण या हिंदुत्व रॅलीत सहभागी होऊन जय शिवाजी, जय भवानीच्या जय घोषाने शहर दणाणून गेले होते. भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.
युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात बाईक रॅलीला स्थानिक गजानन महाराज मंदिरातून सुरुवात करण्यात आली होती.यावेळी तालुक्यातील २00 युवकांनी युवासेनेत प्रवेश केला तसेच शिवसेनेच्या तालुक्यात विविध ग्रा.पं. निवडून आलेल्या ९२ सदस्यांचा बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तर ५ अपक्ष निवडून आलेल्या ग्रा.पं. सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.व कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणार्या डॉक्टर, तलाठी, तहसीलदार, नगरपंचायत कर्मचारी, पोलिस कर्मचारी, आशा वर्कर यांना युवा सेनेतर्फे सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संजय राठोड यांचे बसस्थानक परिसरात आगमन होताच फटाक्यांच्या आतीशबाजीने ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले.
यावेळी मेळाव्याला वनमंत्री संजय राठोड,माजी खा.अनंत गुढे, मा.आ. श्रीकांत देशपांडे, ज्ञानेश्वर धाने पाटील, जिल्हाप्रमुख सुनिल खराटे,शाम देशमुख, प्रविण हरमकर, बाळासाहेब भागवत, बाळासाहेब राणे, प्रमोद कठाळे, अरूण लाहाबर, सौ.शोभा लोखंडे, सौ. प्रिती ईखार, सौ.रेखा नागोलकर, प्रमोद कोहळे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता तालुक्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अथक पर्शिम घेतले.
युवासेना मेळाव्यात तालुक्यातील नांदसावंगी, वेणी गणेशपूर, शिरपूर,येवती,धामक, नांदगाव, शिवणी,कोठोडा, मंगरुळ चव्हाळा येथील अनेक युवकांनी युवासेनेत मंत्री संजय राठोड यांचे हस्ते भगवा दुपट्टा गळ्यात टाकून प्रवेश केला.ं
Related Stories
October 10, 2024
October 9, 2024