लहान वयापासून बचतीची सवय लागली तर आर्थिक शिस्त लागतेच शिवाय भविष्यकाळ अधिक सुरक्षित होतो. नोकरीला नुकतीच सुरूवात केलेल्या तरूणांवर जबाबदार्याही कमी असतात. त्यामुळे ३0 टक्के बचतीचं लक्ष्य ठेवता येतं.
सर्वप्रथम गुंतवणुकीचे योग्य मार्ग शोधा. गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडला नाही तर भविष्यात महागाईचा दर वाढल्यावर आपल्या पैशांचं मूल्यही कमी होतं. त्यामुळे अशा गुंतवणुकीला काहीच अर्थ उरत नाही. फारसे धोके पत्करायचे नसतील तर पोस्ट ऑफिसमधल्या योजना, एनएससी, सुकन्या अशा योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. बँकेच्या तुलनेत पोस्ट ऑफिसमधल्या योजनांवर चांगलं व्याज मिळू शकेल. गुंतवणुकीत थोडे धोके पत्करायचे असतील तर शेअर बाजार, म्युच्युअल फंड यात गुंतवणूक करा. नुकतीच नोकरी सुरू केली असेल तर तुम्ही काही धोके पत्करू शकता. फारशा जबाबदार्या नसल्यामुळे हे शक्य होतं. गाव किंवा शहराच्या लगतच्या प्लॉटमध्ये पैसे गुंतवणं ही एक महत्त्वाची गुंतवणूक ठरू शकते. पुढील दहा वर्षांमध्ये या जागेची किंमत काही पटीने वाढू शकते. त्यासाठी या परिसराचा अभ्यास मात्र नेटका हवा.
Related Stories
September 3, 2024