अमरावती : बडनेरा येथील सुप्रसिद्ध कवी, लेखक, शिक्षक, संग्राहक, वेध सार्वजनिक वाचनालय बोडना, मोर्शी व प्रज्वलीत बहुउद्देशिय शिक्षण संस्था अमरावती चे संस्थापक अध्यक्ष मा. सुरेशकुमार किसनराव बोरकर यांच्या “भारतीय घटनेचा शिल्पकार “या कवितेची निवड शब्ददान प्रकाशन नांदेड प्रा. अशोककुमार दवणे संपादक तर्फे संपूर्ण भारतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर कविता मागविण्यात आल्या व 21व्या शतकातील 2100कविंच्या 2100कविता व 2300पानांचा जगातील पहिला व गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होणाऱ्या “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथ “प्रकाशित होत आहे. त्यामध्ये निवड करण्यात आलेली आहे. बडनेऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
यापूर्वी सुद्धा सुरेशकुमार किसनराव बोरकर यांच्या कवितेची निवड महाराष्ट्रातील विशेषांकासाठी व पुरस्कारासाठी करण्यात आलेली होती. त्यांच्या कविता व समाजप्रबोधनपर लेख अनेक वर्तमानपत्रे व साप्ताहिक मध्ये प्रसिद्ध होत असतात. अनेक कवी संमेलना मधून ते कविता सादर करीत असतात. लॉर्ड बुद्धा टीव्ही वर सुद्धा मान्य वरांच्या कवी संमेलनात कविता सादर केलेल्या आहे. त्यांचे कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गांवर आहेत. सामाजिक कार्यात सुद्धा त्यांचा पुढाकार आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.त्यामध्ये डॉ. रविथ राजवंश, डॉ. अजय मेश्राम, ऍड. योगेश सोनोने, धम्मचारी बोधीप्रिय, धम्मचारी अमितायुस, धम्मचारी सुगतानंद, हरिदास रंगारी,प्रा. अरवींदकुमार मनोहर, नागेश्वर खांडेकर, चंदू वानखडे, गजानन बागडे, अर्चना बोरकर, वेध बोरकर, वंदना बांबोडे, अशोक बोरकर, बाळकृष्ण भोकरे, सुखदेव शेंडे, अरुण खांडेकर, दिनेश डोंगरे, दिनेश मेश्राम, किसनराव बोरकर, शांताबाई बोरकर, नरेश बोरकर, दिनेश गोंडणे, बाळूभाऊ धाकडे, दीपक बोरकर, प्रफुल वाघमारे, कैलास मोहोड, मेघना वाडकर, दिपकराज डोंगरे, निलेश बंनोरे, विलास सहारे,लक्ष्मण पिलावन,दिलीप गवई, संदीप इंगळे, चंद्रप्रकाश अडकणे, निलेश नगरकर इ. नी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Related Stories
December 2, 2023