मुंबई : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी केली. या वेळी त्यांनी टोल आणि या संदर्भातली महत्त्वाची माहिती दिली. भविष्यात टोल नाके बंद होतील, पण टोल नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं. जेवढा प्रवास कराल तेवढ्यासाठीचेच पैसे भरावे लागतील, यासाठी फास्टॅगला जोडणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी लागणार्या जमिनीच्या भूसंपादनविषयक तसेच विविध परवान्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023