मुंबई:महाविकास आघाडीमुळे एकत्र आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत कायमचा घरोबा होण्याची चिन्हं दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेसोबतच्या आघाडीबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादीकडून बोलावण्यात आलेल्या बैठकीत बोलताना अजित पवारांनी पदाधिकार्यांना स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जुळवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अजित पवार म्हणाले, आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी? अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. पण आपल्याला शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या अशा स्पष्ट सूचना पवार यांनी बैठकीत पदाधिकार्यांना दिल्या.
Related Stories
December 2, 2023