यवतमाळ : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतून एक वर्षात सहा याद्या जाहीर करत जिल्ह्यातील ८६ हजार ७९७ शेतकर्यांचे कर्ज माफ केले. याकरिता ६३९ कोटी २ लाख रुपये खात्यावर वर्ग केले आहेत. यामध्ये ५ हजार ९९५ शेतकर्यांचे आधार लिंक नाही. परिणामी, त्यांची कर्जमाफी प्रलंबित आहे. आधार लिंक झाल्यास उर्वरित शेतकर्यांनाही लाभ मिळणार आहे. थेट खात्यावर कर्जमाफी मिळाल्यामुळे शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच सप्टेंबर सन २0१९ पयर्ंत शेतकर्यांना दोन लाख रुपये कर्ज माफीच्या दृष्टीने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. एका वर्षात ६ ग्रीन लिस्ट जाहीर करून कर्जमाफी केली.जिल्ह्यातील एक लाख ६ हजार ८३९ शेतकर्यांनी कर्जमाफीसाठी पोर्टलवर अर्ज केले होते. त्यातून ९५ हजार ९१३ शेतकरी पात्र ठरले होते. असे असले तरी आतापयर्ंत ८६ हजार ७९७ शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, ६३९ कोटी २ लाख रुपये शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग झाले. यामुळे शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्यांकडे अनेक वषार्पासूनचे कर्ज होते.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023