अमरावती : सन 2020-21 या वर्षासाठी 9 जून 2021 पर्यंत अमरावती जिल्ह्यातील चार तालुक्यातील पंधरा रेती स्थळांच्या लिलावाची ई-निविदा-ई लिलाव ऑनलाईन प्रणालीव्दारे दि. 22 डिसेंबरपासून करण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
या निविदा https://amravatico.abcrocure.com संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत असून, रेती घाटासंबंधीची विस्तृत माहिती उपरोक्त संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात व amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
ई-निविदा -ई लिलावामध्ये भाग घेण्यापूर्वी सदर प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी नव्याने नोंदणी करणे तसेच डिजीटल सर्टिफिकेट काढणे आवश्यक आहे. ई-निविदाधारक तसेच लिलावधारकाकडे पॅन कार्ड, जीएसटी रजिस्ट्रेशन (जीएसटीएन कार्ड) असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना रेती ई- निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. रेती लिलावाच्या ई- निविदा ई लिलाव प्रक्रियेत सर्व संबंधितानी भाग घ्यावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी अमरावती यांनी केले आहे.
Related Stories
December 7, 2023