अमरावती : ९ मार्च रोजी जिल्हयात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठया प्रमाणात घट पहावयास मिळाली होती मात्र २४ तास उलटत नाही तोच कोरोनारुग्णांची संख्या दुपट्टीने वाढली.एकाच दिवसात तब्बल ५५४ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्हयात आतापर्यत ४0 हजार ८२२ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. ५ हजार ७३0 रुग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे.३४ हजार ५१४ रुग्णा रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असुन ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यत जिल्हयात ५७८ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहे.
जिल्हयात ६ मार्च रोजी प्रशासनाने लॉकडाऊन हटवुन अनलॉकची प्रक्रिया सुरू करून निर्बध लावण्याचा निर्णय घेतला.प्रशासनाच्या या निर्णयानंतर शहरात पुन्हा नागरिकांची झुंबळ पहावयास मिळाली. भाजीपाला असो वा इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकानी पुन्हा कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंधन केल्याचे दिसून आले.मास्क लावणे अथवा सोशल डिस्टन्सींग या नियमांना पायदळी तुळवीत कोरोनाला अनुकूल अशा वातावरणाची निर्मिती करण्याचा याथर्त प्रयत्न नागरिकांकडून करण्यात आला.विशेष म्हणजे लग्नसमारंभासह इतर कौतुक सोहळयाला मार्यादीत व्यक्तीं उपस्थित रहाव्यात असे आदेश असतांना देखिल जिल्हयात लग्न समारंभा हे मोठया थाटात तसेच उत्साहात साजरे केले जात आहे. शहरी भाग हा मनपा कार्यक्षेत्रात येत असल्याने अनेक ठिकाणी कारवाई होत असल्याचे दिसुन येते मात्र ग्रामिण भागात स्थानिक प्रशासन हे या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे रुग्णसंख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची इतकी भयावह परीस्थिती असतांना देखिल अमरावतीकर या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे रुग्णासह मृतकांच्याही आकडयामध्ये भर पडत आहे.१0 मार्च रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ५५४ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे जिल्हयात आतापर्यत ४0 हजार ८२२ कोरोनग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे.३४ हजार ५१४ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असून ५ हजार ७३९ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.६ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्हयात आतापर्यत ५७८ रुग्ण हे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.
Contents
hide
Related Stories
December 3, 2024