अमरावती : अमरावती जिल्हयात ५३७ ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांचे निकाल आज दि.१८ जानेवारी रोजी घोषीत झाले.येणार्या निवडणुका तसेच नव्याने स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार त्याच बरोबर भाजपा यांनी हि निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची केली होती.जिल्हयात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल हाती आले असून अनेक ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे वर्चस्व पहावयास मिळत आहे. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर याच्या तिवसा ग्रामपंचयतीवर कॉंग्रेसने एकहाती सत्ता मिळविण्यास यश आले असले तरी याच मतदार संघातील महत्वाच्या समजाल्या जाणार्या अनेक ग्रामपंचायतीवर भाजप व स्थानिक आघाडयांनी यश संपादीत केल्याचे दिसुन येत आहे.
अमरावती जिल्हयातील ५५३ ग्रामपंचायती पैकी १३ ग्रामपंचायती या बिनविरोधा झाल्यामुळे ५३७ ग्रामपंचायतीच्या ४ हजार ३९७ सदस्य पदासाठीची मतमोजणी प्रक्रिया १८ जानेवारी रोजी शांततेत पार पडली.महाविकास आघाडी आणि भाजपाने ग्रामपंचायत निवडणुक ही पूर्णपणे प्रतिष्ठेची केल्यामुळे ग्रामपंचायत वर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याचे दिसून आले. जिल्हयात अनेक ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे वर्चस्व पहावयास मिळाले.राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा ग्रामपंचायतवर एकहाती सत्ता मिळविण्यास सश मिळविले असले तरी याच मतदार संघात स्थानिक आघाडी व भाजपाने देखिल चागली कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. राज्याचे माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी वरूड व मोर्शी मतदार संघावर भाजपाचे वर्चस्व असल्याचा दावा केला असून आकडयांची जुळवाजुळव सुरू आहे. चांदूर बाजार तालुक्याअंतर्गत येणार्या ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस तसेच आ. बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. अचलपूर तालुक्यात कॉंग्रेसचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले असून महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. दर्यापूर तालुक्यातील ग्रामपांयतीमध्ये कॉग्रेसला दारून पराभव स्विकारावा लागला असून स्थानिक जनतेने कॉग्रेसचे वर्चस्व नाकारल्यामुळे कॉग्रेसचे शहर अध्यक्ष बबनराव देशमुख, प्रदिप देशमुख, येवदा, अमरावती जिल्हा महासचिव अभिजीत देवके कळमगव्हाण, सोशल मिडीया अध्यक्ष शशांक धर्माळे या नोत्यांना जनतेने सपशेल नाकारले आहे. चादूर रेल्वे तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीपैकी १४ ग्रामपंचायतवर भाजपाने एकहाती सत्ता मिळविली असून महाविकास आघाडीची घसरन झाल्याचे दिसून येत आहे.धामनगाव रेल्वे तालुक्या अंतर्गत येणार्या ५१ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून भाजपा आणि कॉग्रेसला समिर्श यश मिळाले आहे.बडनेरा मतदार संघात युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने घवघवीत यश मिळविल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून निकालांची घोषणा झाली असले तरी महाविकास आघाडी असो वा भाजपा या पक्षातील नेत्याकडून दावे -प्रतिदावे केल्या जात आहे.
Related Stories
October 9, 2024