यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मधयवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळाच्या निवडणुकीत माहाविकास आघाडीने २१ पैकी १६ जागा जिंकून विजय मिळवला आहे.भाजप प्रणित शेतकरी सहकार पॅनलने ५ जागी विजय मिळवून चमक दाखविली.जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीने संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष वेधून घेतले होते. या निवणुकीसाठी सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेऊन निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. विशेषत: शिवसेनेचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, आमदार डॉ. वाजाहत मिर्झा, राष्ट्रवादीचे ख्वाजा बेग, इंद्रनील नाईक, राम देवसरकर, विजय चव्हाण व अन्य नेते तसेच भाजपचे माजी मंत्री मदन येरावार, आमदार अशोक उईके, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. नामदेव ससाणे, आ. संदिप धुर्वे, आ. निलय नाईक यांच्यासह भाजप नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीचा धुरळा संपून काल वादावादीत २१ डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान पार पडले. आज सकाळपासून मतमोजणी सुरू केली. महिला राखीवमधून शैलजा बोबडे, स्मिता कदम ह्या तर विजाभजमधून शिवाजी राठोड, मागास प्रवर्गातून मनीष पाटील विजयी झाले आहे. कळंबमधून बापू पाटील वानखडे, बाभूळगावमधून अमन गावंडे, यवतमाळ राधेश्याम अग्रवाल, पांढरकवडा प्रकाश मानकर, दारव्हामधून शंकर राठोड, झरी जामनी – राजू येलटीवार, घाटंजी – आशिष लोणकर, राळेगाव – वर्षा राजू तेलंगे, वणी – टीकाराम कोनगरे, मारेगाव – संजय देरकर, दिग्रस – संजय देशमुख, नेर – स्नेहल भाकरे, पुसद – अनुकुल चव्हाण, उमरखेड – प्रकाश पाटील देवसरकर, आर्णी – मनीष पाटील, महागाव – शिवाजी राठोड हे विजयी झाले असून आघाडीचे प्रकाश देवसरकर, अनुकूल चव्हाण अगोदरच बिनविरोध निवडून आले आहे.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023