अमरावती : जिल्ह्यात ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचारी व उमेदवार, पोलीस कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या होत आहेत. दि. 23 डिसेंबर पासून 11 हजार 789 चाचण्या करण्यात आल्या. ग्राम पंचायतीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून संबंधितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात 95 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे आढळून आले.
अमरावती तालुक्यात 750, भातकुली तालुक्यात 863, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 883, दर्यापूर तालुक्यात 953, अंजनगाव सुर्जी तालुक्यात 829, तिवसा तालुक्यात 539, चांदूर रेल्वे तालुक्यात 561, धामणगाव रेल्वे तालुक्यात 613, अचलपूर तालुक्यात 972, चांदूर बाजार तालुक्यात 1254, मोर्शी तालुक्यात 1076, वरुड तालुक्यात 876, धारणी तालुक्यात 971 व चिखलदरा तालुक्यात 649 चाचण्या करण्यात आल्या.
या चाचण्यानूसार अमरावती तालुक्यात 18, भातकुली तालुक्यात 4, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 2, दर्यापूर तालुक्यात 6, अंजनगाव सुर्जी तालुक्यात 1, तिवसा तालुक्यात 4, चांदूर रेल्वे तालुक्यात 6, चांदूर बाजार तालुक्यात 1, मोर्शी तालुक्यात 3, वरुड तालुक्यात 7, धारणी तालुक्यात 41 व चिखलदरा तालुक्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले. त्यात उमेदवारांसह मतदान अधिकारी, तलाठी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी, शिक्षक आदींचा समावेश आहे.
Related Stories
December 2, 2023