अमरावती : गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला शाक्यसिंह बुध्दिस्ट सोसायटी आणि विचारयश मासिक समूह द्वारा आयोजित डाँ.रचना निगम ,गुजरात यांच्या अध्यक्षतेत आणि आ. मधू महेश्वरी जी- कर्नाटक, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये Online काव्यसंमेलनाचे आयोजन झूम अँपवर केले होते .या कार्यक्रमाचे आयोजन अस्मिता प्रशांत “पुष्पांजली” भंडारा, आणि कविता काळे – पुणे यांनी केले होते. या कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन सरिता सातारडे- कवयित्री-नागपूर,महाराष्ट्र यांनी केले .महाराष्ट्र राज्यासोबतच भारतातील अनेक राज्यातील कवी आणि कवयित्री या Online कविसंमेलनामध्ये सहभागी झाले होते.या कविसंमेलनामध्ये कवयित्री
शालिनी मांडवधरे- महाराष्ट्र, संध्या श्रीवास्तव- पटियाला, सूर्यकांत भोसले- महाराष्ट्र ,सु श्री लक्ष्मी करियारे ,जाँजगीर -छत्तीसगढ़,मधु माहेश्वरी, कर्नाटक,अस्मिता प्रशांत “पुष्पंजली” भंडारा,महाराष्ट्र ,प्रा.अरुण बा. बुंदेले,अमरावती ,महाराष्ट्र , आ.अर्चना चव्हाण-नागपूर,महाराष्ट्र , प्रा.हृदय चक्रधर- नागपूर, महाराष्ट्र ‘भूपसिंह ‘भारती’-नारनौल(हरियाणा), श्रीमती शीला भनोत – हैदराबाद – तेलंगाना, डाँ. शुभा लोंढे, पुणे, महाराष्ट्र,प्रा.ह्रदय चक्रधर,महाराष्ट्र , कांचन मुन -पुणे-महाराष्ट्र,अरुण गोळे- नागपूर ,महाराष्ट्र ,यांनी “गणराज्य दिन आणि भारतीय संविधान” या विषयावर विविध अर्थपूर्ण काव्यरचना सादर केल्या. या कविसंमेलनाच्या अध्यक्षा डाँ.रचना निगम ,गुजरात यांनी गणराज्य दिनाविषयी विचार व्यक्त करुन अध्यक्षीय काव्यरचना सादर केली.आभार कविता काळे ,पुणे यांनी मानले.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023