अमरावती : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाच्या राजापेठ येथील प्रधानमंत्री कौशल्य केंद्राला जिल्हाधिका-यांनी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिका-यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला. प्रशिक्षणार्थ्यांना इंडक्शन किटचे वाटपही यावेळी त्यांच्या हस्ते झाले. कौशल्य विकास उपायुक्त सुनील काळबांडे, सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी नीता अवघड, केंद्रप्रमुख जुनेद खान आदी यावेळी उपस्थित होते.
राजापेठ येथील प्रधानमंत्री कौशल्य केंद्र (ओरिएन एज्युकेट) मान्यताप्राप्त केंद्र आहे. तिथे स्युइंग मशिन ऑपरेटरचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या कौशल्य विकासाचा वापर करून रोजगार मिळवावा व कौटुंबिक उत्पन्नात भर घालावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी विद्यार्थ्यांना केले.
ही अत्यंत चांगली व युवकांना रोजगाराच्या दृष्टीने सक्षम करणारी योजना आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील अधिकाधिक युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ मिळवून द्यावा. त्यासाठी उपलब्ध प्रशिक्षणाबाबत सर्वदूर माहिती प्रसारित करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी रोजगार अधिका-यांना दिले.
Contents
hide
Related Stories
December 8, 2024
December 8, 2024