अमरावती : जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी पुन्हा वेग पकडला असतांना जिल्ह्य़ातील नागरिक मात्र बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे. गेल्या ५ ते सह दिवसामध्येच तब्बल ६00 च्या जवळपास कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे प्रशासनासमोर चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. ३१ जानेवारी रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्य़ात १२८ नविन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून परिणामी जिल्ह्य़ात २१ हजार ८८७ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आहेत. ४१४ रुग्णांचा आतापर्यत कोरोनामुळे मृत्यू झाला असून ४00 च्या जवळपास रूग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून २१ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्य़ात गेल्या सात ते आठ दिवसांपासून जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पटीसह तिपट्टीने वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून कसोसीने प्रयत्न केल्या जात आहे.
एकीकडे देशासह राज्यात कोरोनाचा वाढता आलेख हा शून्यावर आण्यासाठी प्रयत्न सुरू असतांना अमरावती जिल्ह्य़ात मात्र याच कोरोना आलेखामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ३0 जानेवारी रोजी १४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते तर ३१ जानेवारी रोजी १२८ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
विशेष म्हणजे प्रशासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे तीनतेरा वाजतांना दिसून येत असल्यामुळे कोरोना बाधितांच्या आकड्यांमध्ये वाढ होत आहे हे म्हणणे उचित होईल. जिल्हयात अशाच प्रकारे रुग्णांच्या संख्या वाढत गेल्यास जिल्हा प्रशासनाला पुन्हा लाकडाऊनच्या निर्बंध लादण्यास सक्ती करावी लागेल, हे मात्र नक्की! ३१ जोनवारी १२८ पॉझिटिव्ह रुग्णांसह जिल्हयात आतापर्यत २१ हजार ८८७ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. ४00 च्याजवळपास रुग्णांवर उपचार सुरू असून २१ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Related Stories
December 2, 2023