अमरावती : जिल्ह्यात गत काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
गत काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे व हा आकडा प्रतिदिन शंभरावर गेला असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालावरून दिसून आले आहे. गत आठवड्यात दि. 28 जानेवारीला 78, दि. 29 जानेवारीला 93, दि. 30 जानेवारीला 149, दि. 31 जानेवारीला 128, दि. 1 फेब्रुवारीला 92 व आज दि. 2 फेब्रुवारीला 118 व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचे आढळले आहे. उपचारासाठी जिल्हा कोविड रूग्णालय व आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे. तथापि, नागरिकांनीही मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन केले पाहिजे. या त्रिसूत्रीचा अवलंब करून आपल्यासोबत इतरांनाही सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
Related Stories
December 2, 2023