अमरावती : जिल्हयात कोरोनामुळे १२ रुग्णांचा मृत्यू झाला असुन ६३६ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.३६ हजार ४५२ रुग्णांना आतापर्यत कोरोनाची लागन झाली असून २९ हजार ८४८ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आले आहे.जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट ८१.८८ इतका असुन मृत्यू दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.जिल्हयात सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाबधित रुग्णामुळे प्रशासनासमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. दिवसेदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकड नियंत्रणात कसा आणावा तर दुसरीकडे शहरातील रोजगाराचा प्रश्न असा दुहेरी पेच निर्माण झाला आहे. जिल्हयात ज्येष्ठांना तसेच व्याधीबाधितांना लस देण्याची मोहीम सुरू झाली असतांना देखिल अदयापही याविषयी नागरिकांमध्ये जानजागृती निर्माण झाल्याचे दिसून येत नाही. कोरोना लसीबाबत अद्यापही नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असुन कोरोना लस घ्याव की नाही अशी द्वीधा मनस्थितीमध्ये अमरावतीकर असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.जिल्हयात कोरोना महामारीचा प्रश्न गंभिर झाला असून कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. राज्यासह देशात देखिल अमरावती मधिल कोरोना संकट ह चर्चेचा विषय ठरले असून या गंभिर परीस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडुन शर्तीचे प्रयत्न केल्या जात आहे. जिल्हाधिकारी यांनी सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णाचे गांभिर्य लक्षात घेता ८ मार्च पर्यत लॉकडाऊनचा कालावधी वाढविला असून कोरोना प्रतिबंधीत नियमांचे पालन न केल्यास दंडासह गुन्हा दाखल करण्याचे आदेशी सुध्दा संबंधीत यंत्रणेला दिले आहे.३ मार्च रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्हयात ६३६ नविन कोरोनाग्रस्त आढळून आले असून आतापर्यत जिल्हयात कोरोनामुळे १२ रुग्णांचा आज मृत्यू झाला असून एकूण ५३३ रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.३६ हजार ४५२ रुग्णांना आतापर्यत कोरोनाची लागन झाली असून २९ हजार ८४८ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आले आहे.जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट ८१.८८ इतका असुन मृत्यू दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
Related Stories
September 30, 2024
September 29, 2024