अमरावती :खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण सत्रे सोमवारपासून (18 जानेवारी) सुरु करण्यास परवानगी देणारा आदेश जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.
मिशन बिगिन अगेनअंतर्गत विविध प्रशिक्षण घेणा-या संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील विविध क्रीडा प्रशिक्षण संस्थांना 18 जानेवारीपासून प्रशिक्षण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, इतरही शासकीय प्रशिक्षण संस्थांनाही (यशदा, वनामती, मित्र, मेरी आदी) 18 पासून प्रशिक्षण सत्र सुरु करता येतील. सर्व खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, खासगी शैक्षणिक केंद्रे यांनाही सोमवारपासून वर्ग सुरु करता येतील. मात्र, प्रत्येक बॅचमध्ये जास्तीत जास्त 20 विद्यार्थी असावेत. दोन बॅचमध्ये अर्धा तासाचा अवकाश असावा. या सर्व संस्थांनी वेळोवेळी निर्जंतुकीकरण करून कोरोना प्रतिबंधासाठी सर्व दक्षता घेण्याचेही निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व हॉटेल्स, उपाहारगृहे, खाद्यगृहे व बार सुरु ठेवण्यास यापूर्वी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ती नियमितपणे रात्री अकरापर्यंत सुरु राहतील, असेही आदेशात नमूद आहे.
Related Stories
September 14, 2024
September 8, 2024