चालकाविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोराडी महामार्गावरील गायकवाड ट्रेडर्ससमोर भरधाव ट्रकने कामगारांची वाहतूक करणार्या बसला शनिवारी (५ डिसेंबर) सकाळी ६ वाजतादरम्यान जबर धडक दिली. या अपघातात बसमधील १६ कामगार जखमी झाले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने सर्व कामगारांना बसच्या बाहेर काढून उपचारासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ४0 / वाय. ७४२९ क्रमांकाच्या बसने सर्व कामगार सुंदर बिस्कीट कंपनीतून कामावरून आपल्या हॉस्टेलकडे जात होते. बस कोराडी महामार्गावरील सर्विस रोड पार करीत असताना सावनेरकडून एम. पी. 0९ / एच. जी. ७२३0 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने बसला जबर धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, चालकाच्या बाजुला बसलेले सर्व कामगार दुसर्या बाजूच्या सिटवर फेकल्या गेले. अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून पसार झाला.
सकाळची वेळ असल्याने काही कामगार झोपेत तर कुणी मोबाईल खेळत होते. दरम्यान, भरधाव ट्रकने त्यांच्या बसला धडक दिल्याने काहींचे डोके फुटले तर काहींच्या पाठीचा कणा फॅर झाला. दुपारपर्यंत जखमींवर उपचार सुरू होते. पोलिसांनी घटनास्थळावरून ट्रक व बस दोन्ही जप्त केले. आरोपी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023