मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत गुप्तहेर बनून देमार हाणामारी करायला येणार आहे. तिच्या आगामी स्पाय थ्रिलर धाकड सिनेमाचा लुक समोर आला आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असे कंगनाने सांगितले. धाकड चित्रपट २ ऑक्टोबर २0२१ ला प्रदर्शित व्हायची शक्यता आहे. स्वत: कंगनाने चित्रपटाचे पोस्टर शेयर करत ही माहिती दिली आहे. कंगना राणावतने शेयर केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तिने हातामध्ये तलवार घेतलेली असून ती या पोस्टरमध्ये रावडी लूकमध्ये दिसत आहे. कंगना राणावतने पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ह्यती निर्भय आहे. रागावलेली आहे! ती एजंट अग्नि आहे. १ ऑक्टोबर २0२१ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणारा भारताचा पहिला फिमेल लीड अँक्शन थ्रीलर चित्रपट धाकड! असंही कंगनाने लिहिलेले आहे.
कंगना रणौत धाकड चित्रपटात एजंट अग्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात कंगनाबरोबर अभिनेता अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ताची भूमिका प्रमुख असेल. चित्रपटाचं शूटिंग सारणी (पॉवर प्लांट), पंचमढी आणि भोपाळ इथे होणार आहे. सध्या कंगना राणावत भोपाळ येथे या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. धाकड चित्रपटासाठी कंगना राणावत खूपच उत्साही आहे.
कंगना रणौतने याआधी ट्विट करत असे लिहिले की, धाकड हा महिला मुख्य भूमिकेत असलेला भारतातील पहिला स्पाय अँक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटासाठी मी खूप उत्साही आहे कारण हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या एका नवीन युगाला सुरुवात करणार आहे. ही संधी दिल्याबद्दल कंगाना राणावतने या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आह.
या चित्रपटाचे दिग्दर्शक रझी घई यांनी सांगितले की, धाकड हा एक प्रोजेक्ट आहे जो माझ्यासाठी खूप खास आहे. महिला कलाकारांच्या मुख्य भूमिकेत तयार झालेले अँक्शन चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीत दुर्मिळ आहेत. या चित्रपटामुळे एक नवीन ट्रेंड ठेवण्याचे आमचे ध्येय आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही कोणत्याही जागतिक दर्जाच्या अँक्शनच्या कामगिरीच्या बरोबरीने आहोत याची खात्री करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही.
Contents
hide
Related Stories
December 8, 2024
December 8, 2024