अमरावती : उद्योजक व आस्थापनांनी त्रैमासिक ई- आर वन विवरणपत्र भरण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या ऑनलाईन सुविधांचा वापर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.
ई-आर वन विवरण 31 जानेवारीपूर्वी दाखल करणे आवश्यक आहे. सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील उद्योजक व आस्थापनांना www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून युजर आयडी मिळवून त्यावर लॉग इन करुन विवरण सादर करता येईल. अधिक माहितीसाठी (0721) 2566066 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.