- प्रत्येक आरस्यात प्रतिकाची
- दिसणारी प्रतिमा
- ही खरीच असते असं नाही
- तर आरस्यागणिक प्रतिमा
- बदलत जात असते
- प्रतिकाची वास्तव प्रतिमा बघायची झाल्यास
- आरसाही तेवढाच पारदर्शक असावा लागतो
- अन्यथा काच बाजारात
- अनेक प्रकारचे मिळतात
- तेव्हा काय बदलायचे ?
- ते तुम्ही ठरवा
- मी प्रतिकं बदलणार नाही.
- -अरुण विघ्ने