अमरावती : अमरावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण येथे आज (दि. 19 जानेवारी) रोजी, बारामती जि. पुणे येथील पियागो व्हीकल्स प्रा. लि. या मोटार कंपनीचा रोजगार भरती मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात जिल्ह्यातील 219 आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी मुलाखती घेण्यात आल्या. या विद्यार्थ्यांपैकी 200 उमेदवारांची सदर कंपनीने निवड केली असून काही दिवसांत हे विद्यार्थी बारामतीसाठी रवाना होणार आहे.
आयोजित रोजगार भरती मेळाव्यात व्हीडिओ प्रोजेक्टरच्या माध्यमातून कंपनी संदर्भात संपूर्ण माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली. नामांकित कंपनीत निवड झाल्यानिमित्त सर्व उमेदवारांनी समाधान व्यक्त केले.या मेळाव्याला जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे, संस्थेच्या प्राचार्य मंगला देशमुख, मोर्शी आयटीआयचे प्राचार्य कथले साहेब, बीटीआरआयच्या गुढे मॅडम, प्रशिक्षण अधिकारी एस डी कांबळे, पन्नासे मॅडम,निदेशक गटनिदेशक कर्मचारी प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेळाव्याला प्रशिक्षणार्थी व त्यांच्या पालकांनी सहकार्य केल्याबद्दल कंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक संतोष भोसले व शिवानंद माने तसेच डिव्हीईओ विसाळे साहेब यांनी त्यांचे आभार मानले.
Related Stories
September 14, 2024
September 8, 2024