वरुड तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन !
वरुड :वरुड तालुक्यामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यातआला. कार्यक्रमाची सुरूवात जरूड येथील नवयुवक सिद्धार्थ समाजमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली.
यावेळी बोलतांना आमदार देवेंद्र भुयार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान संपादन करून जगासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सर्वांनी यांच्या चारित्र्य संपन्नतेचा आदर्श घ्यावा. जीवनात यश संपादन करावयाचे असल्यास अभ्यास,मेहनत व
चिकाटीची नितांत गरज असते. स्वप्न साकार करण्यासाठी थोर व्यक्तींचा आदर्श नजरेसमोर ठेवून योग्य दिशेने मार्गक्रमण केल्यास हमखास यश प्राप्त होते. तरुणांनी थोरांचा आदर्श बाळगावा असेही ते म्हणाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी वरुड शहरासह तालुक्यातील जरूड, रोशनखेडा, कुरळी, एकदरा, शे घाट, मलकापूर, बहादा, पुसला यासह विविध गावात सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड तालुक्यातील विविध गावामध्ये डॉ. बाबसाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.
दलितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर लढा देणारे डॉ. बाबासाहेब यांच्या खऱ्या कार्याची महान आठवण आजच्या पिढीला होणे गरजेचे आहे. त्यासाठी केवळ बौद्ध धर्मियांनीच नव्हे; तर इतर समाजातील युवकांनी देखील त्यांचे चरित्र वाचत समाजातील प्रखर परिस्थितीशी नाळ जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.
यावेळी कार्यक्रमाला आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळू कोहळे, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, माजी सभापती निलेश मगर्दे, ऋषीकेश राऊत, रोशन दारोकर, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मोहसीन मिर्झा, उपसरपंच शैलेश ठाकरे, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सोपण ढोले, ग्रा.प. सदस्य योगेश सोळंके,ग्रा.प सदस्या पुष्पाताई बेले, ग्रा.प.सदस्य सुशीलाताई शेंडे, माजी उपसरपंचा रत्नाताई ढोले,नईम शेख सर, संजय घोरपडे, मिलिंद हरले, रंजनाताई हरले, उषाताई हरले, सागर बोरकर, वसीम शेख, सचिन हरले , प्रभाकर काळे, नीलेशजी अधव, निखिल बनसोड, सुशील बेले, योगेश बिसान्द्रे, रोशन अधव, हरीश कांबळे, कमलेश दवंडे, संजय भैसारे, उपसरपंच रुपेश निस्वादे, माजी सरपंच वासुदेव खारोडे,माजी सरपंच सुखदेव फुले, माजी सरपंच निलेश खोडस्कर, रोशन वाघमारे, सागर ठाकरे, सागर फुले,योगेश फुले,सुमित पाटील,निलेश पाटील,पंकज फुले,नरेश फुले, ज्ञानेश्वर फुले यांच्यासह विविध गावातील नागरिक उपस्थित होते.
Related Stories
December 2, 2023