वरुड तालुका प्रतिनिधी : शासनाने ‘हर घर नल से जल’ या उपक्रमांतर्गत २०२४ पर्यंत नळाद्वारे दरडोई ५५ लिटर पाणी देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी नियोजित करण्यात आलेल्या जल जीवन मिशनला यशस्वी करतांना वरुड मोर्शी तालुक्यातील गावांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपाययोजना कार्यान्वित करण्याचे आदेश आमदार देवेंद्र भुयार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
वरुड मोर्शी तालुका आधीच ड्राय झोन मध्ये असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी भटकावे लागत असल्यामुळे नागरिकांना संकटाचा सामना करावा लागतो त्याकरिता ग्रामीण भागातील नागरिकांच्या पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी मोर्शी वरुड तालुक्यातील दापोरी, हिवरखेड, मानिमपूर, इणापूर, पिंपळखुटा लहान, बाभूळखेडा, बेलोरा, टेंभणी, गव्हानकुंड, धामनधस, कुमुंदरा, पंढरी, पळसोन, लाडकी आसोना, पिंपळखुटा मोठा, येरला, उमरखेड, बेलोना, इसंबरी, बहादा मांगोना, गोरेगाव, धनोडी, कचूर्णा, निंभी, वडाळा, वाठोडा, बेसखेडा, सावंगी, खानापूर, यासह विविध गावातील विहीर, पाण्याची टाकी, अंतर्गत व पूरक पाईप लाईन, या कामांना तांत्रिक मंजुरात मिळवून प्रसकीय मंजुरीकरिता तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दिले.
वरुड मोर्शी तालुक्यामध्ये या मिशनला सुरुवात करण्यात आली असून ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’ या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जल जीवन मिशनअंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत वरुड मोर्शी तालुक्यातील सर्व ग्रामीण भागांतील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. या नवीन योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अस्तित्वातील ४० लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध असणाऱ्या जुन्या योजनादेखील आता ५५ लिटर प्रतिमाणसी प्रतिदिवस योजनेमध्ये परिवर्तित होणार आहेत.
आमदार देवेंद्र भुयार यांनी आढावा बैठकीमध्ये वरुड मोर्शी तालुक्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या यांनादेखील पुढील शंभर दिवसांत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्याचे उद्दिष्ट या मिशनमध्ये निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला त्यांच्या घराजवळ नळजोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाणीपुरवठा शाश्वत व्हावा, यासाठी आवश्यक सर्व उपाययोजनांची पूर्तता या योजनेमध्ये समाविष्ट आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना करणे व देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकसहभागातून करण्यात येणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात जल जीवन मिशन राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक विभागाला निर्धारित लक्ष्य देण्यात आले. या योजनेत सर्व शाळा, अंगणवाड्या, आदिवासी आश्रमशाळा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
वरुड मोर्शी तालुक्यातील पाणी समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी वरुड येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन आढावा बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीला पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता संदीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळू कोहळे, नरेंद्र जिचकार, मोर्शी येथील गट विकास अधिकारी पवार, वरुड येथील गट विकास अधिकारी बोपटे, उप अभियंता काळे, शाखा अभियंता, सहाय्यक भुवैज्ञानिक यांच्यासह आधी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024
September 5, 2024