अमरावती : आदिवासी विकास विभागाअंतर्गत अनुसूचीत जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित निवासी शाळेमध्ये इ. 1 ली व 2 री मध्ये प्रवेश देणे या योजनेअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी दर्जेदार नामाकिंत इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांची सन 2021-22 करिता निवड करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नामाकिंत शाळांनी ऑनलाईन पध्दतीने https://namankit.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. 31.डिसेंबर 2020 पर्यत अर्ज सादर करावे.
ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग कार्यालयामार्फत नामाकिंत शाळांची तपासणी करून सचिव स्तरीय समितीस पात्र शाळांचे प्रस्ताव सादर करण्यात येतील. शाळा / संस्थानी ऑनलाईन अर्ज दि. 9 ते दि. 31 डिसेंबर 2020 पर्यत सादर करावे. ऑनलाईन प्रस्ताव प्राप्त सर्व शाळांची तपासणी दि. 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यत करण्यात येईल.
इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा/संस्थांनी शाळासंबधी सर्व आवश्यक माहिती भरून दि.31 डिसेंबर 2020 अर्ज सादर करावेत असे, सहाय्यक आयुक्त शिक्षण कार्यालय अमरावती यांनी कळविले आहे.
Related Stories
November 28, 2023
November 27, 2023
November 27, 2023