मुंबई : नव्या वर्षात अनेक नियम बदलताना आपण दरवर्षी पाहतो. आणि हे वर्षही त्याला अपवाद नाही. उद्यापासून म्हणजेच १५ जानेवारी २0२१ पासून मोबाईल नंबरात थोडासा बदल होणार आहे. देशभरातल्या सर्व कंपन्यांच्या मोबाईल नंबरमध्ये हा बदल होईल. देशभरात लँडलाईनवरून फोनवर कॉल करण्यासंदर्भातला हा नियम आहे.
या नियमानुसार लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करताना नंबरआधी शून्य लावणे बंधनकारक असेल. दूरसंचार विभागाने यांच्याशी संबंधित ट्रायच्या प्रस्तावाला मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये स्वीकारलं होते. दावा आहे, की यामुळे दूरसंचार सेवा देणार्या कंपन्यांना अधिक नंबर्स बनवता येतील. यामुळे आता तुमचा नंबर सांगतानाही नवा – बदललेला नंबर सांगावा लागेल.
लँडलाईनवरून मोबाईलवर नंबर डायल करण्याच्या पद्धतीत बदल करण्याबाबत ट्रायनं काही शिफारशी केल्या होत्या. दूरसंचार विभागानं मागच्या वर्षी २0 नोव्हेंबरला एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं, की या शिफारशी मंजूर करण्यात आल्या आहेत. आता त्यानुसारच लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करताना शून्य लावणं बंधनकारक असेल.
आता सर्व दूरसंचार कंपन्यांना लँडलाईनच्या सर्व ग्राहकांना शून्य डायल करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल. ही सुविधा आता सध्या आपल्या क्षेत्राच्या बाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे. दूरसंचार कंपन्यांना या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यासाठी १ जानेवारीपयर्ंतचा वेळ दिला गेला होता. मात्र आता ही बाब उद्यापासूनच लागू करण्यात येणार आहे.या नव्या बदलाबाबत सर्व कंपन्या आता आपल्या ग्राहकांना माहिती देतील.
Related Stories
September 30, 2024
September 29, 2024