अमरावती : पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात येत नसल्याने राज्यातील पत्रकार जगतामध्ये कमालीची नाराजी दिसून येत होती याबाबत राज्यातील पत्रकारांच्या विविध संघटनेकडून मागणी सुद्धा जोर धरत होती सन २०१६ पासून पॉवर ऑफ मीडिया या पत्रकारांच्या अग्रणी संघटनेने ही मागणी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सतत रेटून धरली व याचा पाठपुरावा केला याबाबत पॉवर ऑफ मीडियाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांनी शासनास सविस्तर प्रस्ताव पाठऊन सतत पाठपुरावा केला आणि राज्याचे मुख्यमंत्री नाण्उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे ही मागणी मान्य करण्याची विनंती केल्याने त्यांनी याबाबत त्वरित सामान्य प्रशासन विभागाला तत्सभधीचे आदेश दिले आणि सामान्य प्रशासन विभागाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात येणाऱ्या शासकीय परिपत्रकामध्ये याबाबतची अधिकृत नोंद घेतली व त्यासंबंधीचे पत्र अमरावती विभागाचे अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील पत्रकार जगतामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे ही मागणी तातडीने मंजूर केल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांनी आभार व्यक्त केले आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे
Related Stories
December 7, 2023