आंतरजातीय विवाहाचं हुड

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

सुषमा नावाची ती मुलगी. मुलगी स्वभावानं तशी वात्रटच होती. त्यातच ती आता वयात आली होती. सुषमा जशी वयात आली. तशी तिची शान फारच वाढली होती. चेह-यावर फ्रेशवाश तसेच डोळ्याला काजळ ओठाला ओष्ठरंग लावून अगदी पुर्ण शरीरसौंद् यात राहणं तिला आवडत होतं. त्यातच तोकडे कपडे घालून ती वस्तीतही मिरवत होती. सुषमा लहानपणापासूनच तोकडे कपडे वापरत होती. लहानपणी ठीक होतं. पण आता ती मोठी झाली होती. त्यातच तिच्या तरुणपणाच्या काळात तोकडे कपडे घालण्याला घरच्या कुणाचाच विरोध नव्हता. मात्र वस्तीतील लोकं त्यावर काहीबाही बोलत. तसं पाहता एकदा वस्तीतील एका व्यक्तीनं तिच्या आईला व तिला त्याबद्दल टोकलं. परंतू फैशनेबल राहण्याच्या सवयीनं सुषमा काही केल्या कुणाचं ऐकायला तयार नव्हती वा तिची आईही त्याबद्दल त्या वस्तीतील माणसाला नाही ते बोलली. ते बोलणं सर्वांनी न्याहाळलं होतं. आता ती फैशनेबल राहो की कशीही वागो, लोकं तिला आता बोलत नव्हते.
तिचं फैशनेबल राहाणं……..त्यावर कुणाचाच वचक नसणं ही गोष्ट तिला मनमानी करण्याला प्रेरणा देवून गेली. त्यातच तिचा असा स्वभाव पाहून तिच्या जातीतही तिची चर्चा होतीच. त्यामुळं तिचा विवाह जातीत होईल काय अशी आशंका तिच्या मायबापाला होती. त्यातच तिच्या व तिच्या आईच्या मनात आंतरजातीय विवाहाचं हूड आलं होतं. मुलगी तोकड्या कपड्यात तर राहाते खरी. पण हे तोकडे कपडेच तिच्या विवाहानंतर संसारवेल फुलण्यापुर्वीच संसार तोडेल असं तिच्या मायबापांनाही वाटलं नाही. त्यांनी तिला अगदी उच्चभ्रू संस्कृतीनं वागवलं. संस्कृती मुळातच जपली नाही. त्यातच त्याच संस्कृतीत वाढता वाढता मुलीनं अगदी अल्पवयातच एका आंतरजातीय मुलाशी विवाह केला. मुलगा तसा पाहायलाही देखणा नव्हता. तो मदिरापान करणारा होता. पण तो मुलगा फैशनेबल राहात असल्यानं व मित्राच्याच गाड्या फिरण्यासाठी वापरत असल्यानं तिला आवडला. त्यातच तिनं आईवडीलांना न सांगता विवाह केला. सुषमाचा विवाह म्हणजे तिची शुद्ध फसगतच होती. तिचा पती हा अजिबात कामाला जात नसे. त्यातच मित्रांकडून उधारी पैसे घेतल्यानं मित्र घर उधारीचे पैसे मागायला येत असत. त्यातच ते काहीबाही बोलत असत. सुषमा ते सगळं ऐकत होती. तिला वाईट वाटत होतं. पण आता तिच्याजवळ उपाय नव्हता. फैशनतर अदृश्यच झाली होती. एव्हाना आता अंगावर पुरेशी कापडंही अंग झाकायला मिळत नव्हतं.

ज्यावेळी सुषमाला घालायला कपडे मिळायचे. त्या काळात फैशन म्हणून सुषमा तोकडे कपडे घालायची नव्हे तर संस्कृतीलाही तिनं धाब्यावर बसवलं होतं. कारण तिला पुर्ण कपडे न वापरता तोकडे कपडं वापरणं ही फैशन वाटत होती. ते सर्व नियती बघत होती. आज मात्र संसारात पडल्यावर तिला अंग झाकावसं वाटत होतं. आज तोकडे कपडे वापरणं फैशन वाटत नव्हती. कारण अंगावरचे कपडेही ती घेवू शकत नव्हती. पती दारुडा मिळाल्यानं व घरातील पैसा संस्कृतीच्या रुसल्यामुळे नष्ट झाल्यानं आज तिला पुरेसे अंगावरच्या नाजूक भागावरचेही कपडे कुजल्यानं फाटत चालले होते. ही फैशन नव्हती.तर हा तिनं मायबापाच्या घरी राहात असतांना केलेल्या संस्कृतीच्या अपमानाचा कित्ता होता. ज्या कित्त्यानं तिलाच वनोधारी लावले होते. तिचा पती ऐतखावू तर होताच. शिवाय तो कामाला जात नसे. घरात जेव्हा उपाशी राहण्याची वेळ सुषमावर आली. तेव्हा मात्र तिनं कामाला जाणं सुरु केलं. परंतू ती कामाला जात असली तरी तिला तिच्या पतीपासून सुख मिळत नव्हतं. तिचा पती दिवसभर घरी राहायचा नव्हे तर तोच पती तिचे कमावलेले पैसे चोरायचा. त्या पैशात तो दारु प्यायचा. तसेच कधी दारुसाठी भांडेही विकायचा. ती कामे करुन संसार चालवत चालवत व आपल्या नशीबावर हवाला देत देत सुषमाला एक लेकरु झालं. त्याला पोषायची जबाबदारी तिच्या पतीवर आली. पण तो जबाबदारी घेईल तेव्हा ना. त्याला कधी कधी जेव्हा भूक लागायची. तेव्हा तेव्हा तो लेकराचं दूधही पिवून टाकायचा. पण कामाला अजिबात जायचा नाही. शेवटी सुषमा तरी किती सहन करणार. तिच्या मायबापानं पोरीची काही चूक झाली, म्हणून सुरुवातीला थोडासा पैसा पुरवला. पण ते तिचं रोजचंच नाटक झाल्यानं मायबापानं अंग काढून घेतलं. आता मात्र तिची चारही बाजूनं गळचेपी होत होती. मायबापाला मदत मागीतली तर मायबाप तसे. पतीकडून अपेक्षा केली तर पती तसा. काय करावं हे तिलाच सुचत नव्हतं. कधी आत्महत्येचेही विचार यायचे. पण लहानगं बाळ. कधी बाळाला घेवून आत्महत्या करायचे विचार यायचे. पण त्यात बाळाचा काय दोष? ती पश्चाताप करु लागली. शेवटी तिनं विचार केला. आपण आपल्या पतीला सोडायचं. त्याला कायमचं सोडायचं.
पतीला कायमचे सोडण्याचा केलेला विचार सुषमाला आनंद देवून गेला. तिनं त्याला सोडलं. ती मायबापाच्या घरी आली. मायबाप तिचं आजही दुसरा विवाह लावू पाहात होते. पण ती त्यावर नकार द्यायची. आज ती स्वतः पश्चाताप करीत बसायची की तिनं जर फैशनेबलपणानं न वागता साधेपणानं वागून मायबापाच्या नाही तर समाजाच्या रितीरीवाजानुसार विवाह केला असता तर कदाचित आज दिवस वेगळे असते.पतीला सोडल्यावर सुषमा शेवटपर्यंत कोणत्याही माणसाच्या आधारानं जगली नाही. राहिलीही नाही. तसेच ती जशी आपल्या मायबापाच्या घरी फैशननं राहिली, वागली. तसं तिनं आपल्या मुलीला शिकवलं नाही. तिची मुलगी आर्या ही आजही साधी भोळी मुलगी म्हणून नावलौकीक मिळवीत होती. आर्याचा विवाहही साध्याच पद्धतीनं झाला. तिला तिच्या मनालायक जोडीदार मिळाला व आताही ती खुशच आहे.

अलिकडे मुलंमुली फैशन करतात. तोकड्या कपड्यात मुली दिसल्या रे दिसल्या की ज्याप्रमाणे भुंगे एखाद्या फुलाच्या भोवताल घिरट्या घालतात. त्याप्रमाणे ती मुलंही त्या मुलींवर आपले जाळे फेकत असतात. ते मुलींना भाळविण्यासाठी रोजची गाडी बदलवतात. रोजचे कपडे बदलवतात नव्हे तर नव्या फैशनेनं राहतात. पण दिव्याखाली अंधार असल्यागत ती मुलं ही दिखाव्याला जरी चांगली वाटत असली तरी वास्तविक जीवनात सपशेल खोटारडी निघतात व अयशस्वी ठरतात. पण तीच मुलं असं काही जाळं फेकतात की मुलींना त्यांच्यात चांगूलपणा दिसून येत असतो. आंतरजातीय विवाहाला कोणाचा विरोध असू नये. असं सुषमालाही आज वाटत होतं. पण आंतरजातीय विवाह करतांना आपल्याला त्या मुलातील गुण अवगुण कळत नाही. ज्याप्रमाणे समाजातील मुलांना मुलीचे मायबाप जवळून ओळखू शकतात. तसं आंतरजातीय विवाहात होत नाही. पण ज्याप्रमाणे सुषमाला लागलेली आंतरजातीय विवाहाची हुडहुडी तिचा रोजचा जीव घेत होती. तसा रोजचा जीव जावू नये म्हणून आजही सुषमा मार्गदर्शन करीत होती त्या लेकरांना………. जी लेकरं आंतरजातीय विवाहाची स्वप्न रंगवीत होती. विवाह बंधनात अडकण्यासाठी. जे विवाह बंधन आज तारेवरची कसरत ठरलं होतं.

    अंकुश शिंगाडे
    नागपूर
    ९३७३३५९४५०

Leave a comment