मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर बजेट देशासाठी पाहिजे,निवडणुकांसाठी नाही,अशी मार्मिक टीका केली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यंमत्री ठाकरे यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अधिक माहिती घेऊनच यावर सविस्तर भाष्य कारेन असं सांगून त्यांनी या अर्थसंकल्पावर अधिक बोलणे टाळले.
यंदाच्या अर्थसंकल्पात पश्चिम बंगाल,आसाम, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पार पडणा?्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या राज्यांसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत असा आरोप देशातील सर्वच विरोधी पक्षांनी केला आहे.महाराष्ट्रासाठी नागपूर आणि नाशिक मेट्रोसाठी तरतूद वगळता कोणतीही भरीव तरतूद नसल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आता यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भर पडली असून उद्धव ठाकरे आता काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Contents
hide
Related Stories
November 7, 2024
November 4, 2024
November 2, 2024