नवी दिल्ली : कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावल्यामुळे महाराष्ट्रातील 4 महिला पोलीस अधिका-यांचा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ‘कोविड वूमन वॉरियर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी येथील विज्ञान भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय माहिती व प्रसारण श्री जावडेकर यांच्यासह राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा तसेच आयोगाचे इतर सदस्य उपस्थित होते.
कोरोना महासाथीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या-ज्या महिलांनी विविध क्षेत्रात कर्तव्यपालन केले त्यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 4 महिला पोलीस अधिक-यांचा समावेश आहे. सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते, औरंगाबाद पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह, मुंबई पोलीस उपायुक्त नियती ठाकर-दवे यांनाही यावेळी गौरिवण्यात आले.
Contents
hide
Related Stories
November 27, 2024