- वाचनाचा नाद।
- जीवन घडले ।
- जीवन जगले।
- साहित्यिक॥१॥
- अण्णाभाऊ साठे।
- थोर साहित्यिक।
- साहित्य प्रेरक।
- अण्णाभाऊ॥२॥
- साहित्य लेखन।
- कथा कादंबरी ।
- परदेशवारी।
- रशियाची॥३॥
- नाटक पोवाडे।
- विपुल लेखन।
- प्रवास वर्णन ।
- रशियाचे॥४॥
- सत्तावीस देशी।
- भाषांतर मान।
- विश्वाचे भूषण।
- अण्णाभाऊ॥५॥
- अण्णाभाऊ साठे।
- आज जन्मदिन।
- करांनी वंदन।
- कोटी कोटी॥६॥
- प्रा.अरुण बा. बुंदेले,
- अमरावती
- भ्र.ध्व.८०८७७४८६०
- Email:arunbundele1@gmail.com
्