कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्रावर खबरदारी
अमरावती : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील 77 केंद्रांवर आरोग्य तपासणी पथकांसह आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होती. कोविड-19 ची लक्षणे आढळलेल्या किंवा पॉझिटिव्ह असलेल्या मतदारांनाही त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टोकन देऊन दुपारी 4 ते 5 ची वेळ मतदानासाठी देण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर विलगीकरण कक्षाचीही सोय करण्यात आली होती. त्यानुसार विभागात एकूण कोविड-19 संशयित आढळलेल्या आठ मतदारांनी दुपारी चार ते पाच या वेळेत मतदानाचा हक्क बजावला. आरोग्य पथकाकडून पुरेशी काळजी घेऊन या मतदारांना त्यांचे मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने सहाय्य करण्यात आले. आवश्यक तिथे पीपीईही कीटही उपलब्ध करून देण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील मतदान केंद्रावर मतदार असलेल्या कोविड पॉझिटिव्ह रूग्णालाही टोकन प्राप्त करून देण्यात आले व दुपारच्या निर्धारित वेळेत येऊन या मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला. आरोग्य व मतदान पथकांनी पुरेशी खबरदारी घेऊन ही प्रक्रिया पार पाडली, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023