- माह्या लेकीचा लेकीचा
- कसा संसार फुलला
- तिच्या संसाराचा वेल
- नभी मांडवात गेला !!
- बहरला बहरला
- फुले वेलीवर फुलं
- मेघ,आभाळ मायेनं
- पोटी बीज अंकुरलं !!
- जीव फुटला मातीले
- कसा कोंबा कोंबातून
- केसर कस्तुरीचा गंध
- येई रानावनातून !!
- टंच भरलं कणीस
- झोम्बे पानोपानी शेंग
- रानी तरारल पिकं
- आले नव्हतीच रंग !!
- निघे बिजातून बीज
- कैसी निसर्गाची माया
- कधी माती होई पोट
- कधी पोट होई काया !!
- झाले घामाचे रे मोती
- असं पिकलं रे रान
- धान पेरलं मातीत
- आलं मातीतून धन !!
- -वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा पोलीस उपनिरीक्षक (से.नि)
- अकोला 9923488556