Sunday, October 26

वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोय

वर्ध्यात धावत्या दुचाकीवर वीज कोसळली – काका-पुतण्याचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोय

वर्धा : नैसर्गिक आपत्तीपुढे माणूस किती असहाय्य ठरतो याचं हृदय पिळवटून टाकणारं उदाहरण वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळालं. शुक्रवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोनेगाव-अल्लीपूर मार्गावरून चारमंडळकडे जात असताना अचानक विजेचा कडकडाट झाला आणि धावत्या दुचाकीवरच वीज कोसळली. या भीषण घटनेत काका आणि पुतण्या जागीच ठार झाले, तर मुलगा गंभीर जखमी झाला.

भिवापूर येथील अनिल ठाकरे हे आपल्या १७ वर्षीय मुलगा वेदांत व पुतण्या सौरभ यांच्यासोबत दुचाकीवरून सोनेगावमार्गे चारमंडळकडे जात होते. दरम्यान, अचानक पावसाला सुरुवात झाली आणि आकाशात विजांचा कडकडाट वाढला. धोतरा चौरस्त्यावर पोहोचताच त्यांच्या दुचाकीवर वीज कोसळली. या प्रचंड आघाताने अनिल ठाकरे आणि त्यांचा पुतण्या सौरभ यांचा जागीच मृत्यू झाला. तर, वेदांत ठाकरे हा गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. आकाशातून आलेल्या या मृत्यूच्या झटक्याने एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

———————

नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

QR

———————

हे वाचा-सौरऊर्जा-काळाची-गरज

———————

वर्ध्यात धावत्या दुचाकीवर वीज कोसळली

———————

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.