वैष्णोदेवी मंदिर यात्रा 7 दिवसांपासून बंद, पावसामुळे भक्त निराश

कटरा (जम्मू काश्मीर): श्री माता वैष्णोदेवी मंदिराची यात्रा सलग सातव्या दिवशीही स्थगित राहिली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भूस्खलन व पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात्रेचा मार्ग धोकादायक झाल्याने प्रशासनाने तात्पुरती यात्रा थांबवली.
● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!
हजारो भक्त कटरा, त्रिकुटा डोंगर परिसरात अडकलेले आहेत. हॉटेल्स, धर्मशाळा येथे गर्दी वाढली आहे.रोपवे, हेलिकॉप्टर, बैटरी कार यांसह सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रद्धालूंच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.हवामान सामान्य झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. यात्रेवर जाण्याआधी अधिकृत वेबसाईटवरूनच अपडेट तपासावे, असे प्रशासनाचे आवाहन केले आहे.
• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
