Sunday, October 26

‘मनाचे श्लोक’चा झाला ‘तू बोल ना’! वाद मावळला, सिनेमा उजळला!

‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव बदलून ‘तू बोल ना’, मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित चित्रपट 16 ऑक्टोबरला रिलीज

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा नावाच्या वादावरून चर्चा रंगली होती. अभिनेत्री व दिग्दर्शक मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित “मनाचे श्लोक” या चित्रपटाच्या नावावरून धार्मिक संघटनांनी आक्षेप घेतला होता. संत समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथाशी साधर्म्य असल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत होता. परिणामी पुण्यातील काही चित्रपटगृहांमध्ये शो थांबवण्यात आले आणि आंदोलनही झालं.

परंतु, अखेर सर्व वाद मिटवत चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला महत्वाचा निर्णय आता हा चित्रपट “तू बोल ना” या नव्या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

10 ऑक्टोबर रोजी “मनाचे श्लोक” या नावाने रिलीज झालेल्या चित्रपटाचा प्रवास सुरुवातीला खडतर ठरला होता. परंतु, आता सर्व गैरसमज दूर करून 16 ऑक्टोबर रोजी “तू बोल ना” या नव्या नावाखाली चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या कथेत मानवी मन, विचार, नैतिक मूल्यं आणि समाजातील वास्तवाचा वेध घेण्यात आला आहे. दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे म्हणाल्या, “धार्मिक नाव असणं म्हणजे धार्मिक विषय असणं नव्हे. ‘मनाचे श्लोक’ हे शीर्षक तत्त्वज्ञानात्मक प्रतीक होतं. तरीही प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही नाव बदलण्याचा निर्णय घेतला.”

“धार्मिक नाव असणं म्हणजे धार्मिक विषय असणं नव्हे. ‘मनाचे श्लोक’ हे शीर्षक तत्त्वज्ञानात्मक प्रतीक होतं. तरीही प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही नाव बदलण्याचा निर्णय घेतला.” “जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे.”आता “वाद मावळला, सिनेमा उजळला”!प्रेक्षक नव्या नावाच्या “तू बोल ना” या चित्रपटाकडून तितक्याच संवेदनशील आणि विचारप्रवर्तक सिनेमाची अपेक्षा करत आहेत.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.