एफवायपासून युपीएससी अभ्यासक्रम : मुंबई विद्यापीठ-ठाणे महापालिकेचा करार
मुंबई : युपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना आता पदवी अभ्यासक्रमासोबतच तयारीची संधी मिळणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये शुक्रवारी झालेल्या ऐतिहासिक करारामुळे एफवायपासूनच विद्यार्थ्यांना युपीएससी अभ्यासक्रम शिकता येणार आहे.स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमाची माहिती मिळणे आवश्यक असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांना ते व्यवस्थित मिळत नसल्याने अपयश येते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने १९८७ मध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था स्थापन केली. आजवर हजारो विद्यार्थ्यांनी या संस्थेत शिक्षण घेतले असून आता या संस्थेने एक पाऊल पुढे टाकले आहे.या महत्त्वाच्या करारावर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु रवींद्र कुलकर्णी आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव य...
