Sunday, December 7

Tag: uncategorized

श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहण
Article

श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहण

श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलेचे रसग्रहणवयाच्या तेविसाव्या वर्षी पहिली गझल लिहिणारे मराठी गझल साहित्यातील प्रख्यात श्रेष्ठ नामवंत गझलकार आदरणीय राऊत सरांची देवप्रिया / कालगंगा अक्षर गण वृत्तातली ही गझल मला खूप आवडल्याने मी ह्या गझलेचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे.गझलओठ माझे चुंबिण्या ओठांवरी आली गझल हात माझा घेत हाती प्रेयसी झाली गझलत्या खळीच्या भोवऱ्याने जीव माझा घेतला बोलताना मोकळे ती हासली गाली गझलतू लिही नशिबात माझ्या संकटांची शृंखला फक्त त्यांच्या सोबतीने तू लिही भाली गझलहिंडतो का जागजागी तू अनाथासारखा भंगलेल्या माणसांची ती खरी वाली गझलजन्म माझा झिंगण्याची दोन होती कारणे एक प्याला अंगुराचा, एक ही साली गझलपोचलो स्वर्गात मी पण खंत आहे अंतरी एक माझ्या आवडीची राहिली खाली गझल - श्रीकृष्ण राऊतआदरणीय राऊत सरांच्या ह्या गझलेचा मतलाच एवढा सुंदर नि नवयुवती समान आकर्षक आहे की ...
थंडीत प्या खास लसणाचा चहा.!
Article

थंडीत प्या खास लसणाचा चहा.!

थंडीत प्या खास लसणाचा चहा.!* कफ, सर्दी, खोकला आणि ताप दूर करण्यासाठी  * जाणून घ्या कसा बनवाल!जसजशी थंडी वाढते तसतशा आरोग्यासंबंधी अनेक समस्या डोकं वर काढतात. जसे की, कफ, सर्दी, खोकला आणि ताप. इतरही अनेक गंभीर समस्या होण्याचा धोका या दिवसात वाढत असतो. अशात लोक अनेक घरगुती उपाय करतात. असाच एक खास उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. लसूण, आलं, काळे मिरे यांसारख्या उष्ण गुण असलेल्या पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच कफ आणि सर्दी दूर करण्यासाठी तर लसणाचा चहा अधिक फायदेशीर मानला जातो.हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!लसणाचा चहा आणि त्यापासून होणाऱ्या फायद्यांबाबत अनेकांना माहीत असेलच. लसणाचा चहा म्हणजेच गार्लिक टी एका पावरफुल टॉनिक मानलं जातं. ज्याने कफ आणि सर्दी-पळसा दूर करण्यास मदत मिळते.अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, लसणाचा चहा हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्या...
वर्षानुवर्ष एकच टॉवेल वापरताय काय ?
Gerenal

वर्षानुवर्ष एकच टॉवेल वापरताय काय ?

वर्षानुवर्ष एकच टॉवेल वापरताय काय ?एक टॉवेल जास्तीत जास्त किती दिवस वापरलेला चांगला?आपण सगळेच सकाळी उठल्यावर दात घासणे, आंघोळ करणे या क्रिया करतो. काही जण तर संध्याकाळी ऑफीसमधून किंवा बाहेरुन घरी आल्यावरही पुन्हा आंघोळ करतात. आंघोळ झाली की अंग पुसण्यासाठी आपण टॉवेल वापरतो. हे टॉवेल टर्किस, कॉटन, पंचा अशा विविध कापडाचे, आकाराचे आणि रंगांचे असतात. लहान मुलांसाठी नेहमीपेक्षा थोडे सॉफ्ट टॉवेल वापरले जातात तर काही जण आवर्जून जास्त खरखरीत असणारे टॉवेल वापरतात. काही जण रोजच्या रोज हा टॉवेल धुवायला टाकतात तर काही जण २ ते ३ दिवस वापरुन टॉवेल धुतात हॉस्टेलमध्ये राहणारी किंवा बॅचलर मंडळी तर ८ दिवस एकच टॉवेल वाळवून पुन्हा पुन्हा वापरतात.आरोग्याच्या दृष्टीने हे फारसे चांगले नसते कारण त्यामुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता असते. टॉवेल धुणे आणि मग वापरणे ही एक बाब झाली पण काही जण टॉवेल चांगला टिकला...
नाट्यप्रेमी करजगाव…!
Article

नाट्यप्रेमी करजगाव…!

नाट्यप्रेमी करजगाव...! करजगावातील नागरिकांना आपली रोजची कामे आणि जबाबदाऱ्या पार पाडून आलेला थकवा शिनभाग घालवण्यासाठी आणि आपले जीवन सुखी समाधानाने घालविण्यासाठी मनोरंजनाची अनेक साधने होती. भजन , किर्तन, प्रवचन, रामलीला, कटपुतली , लोकगीते, लोकनृत्य, दंढार, कलापथक, जलसे, तमाशे याद्वारे गावातील प्रत्येक जण आपले मनोरंजन करून घेत असे त्याच प्रमाणे नाटक सुद्धा करजगावकरांचे मनोरंजनाचे महत्त्वाचे साधन होते. नाटकाद्वारे समाजातील वाईट प्रथा, परंपरा ,सामाजिक प्रश्न याबाबत जनजागृती होऊन सामाजिक परिवर्तनाला मोलाची मदत झाली. मागील आठ दशकापासून करजगावला नाटकाची परंपरा लाभली. या काळात वेगवेगळ्या नाट्य मंडळाद्वारे प्र .के. अत्रे ,बाळ कोल्हटकर , मधुसूदन कालेलकर या सारख्या प्रसिद्ध नाटककारांच्या सामाजिक विषयावरील अनेक नाटकांचे प्रयोग येथे करण्यात आले.करजगावात नाटकाची सुरुवात 1950 पूर्वीचं झाल्याचे दिसून येत...
नसाब एक परंपरा…!
Article

नसाब एक परंपरा…!

नसाब एक परंपरा...!चोहीबाजूने डोंगरपायथ्याशी वसलेले यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील अंदाजे 4000 हजार लोकसंख्या असलेले करजगांव. गावातील बंजारा समाजातील आदर्श परंपरा म्हणजेच ‘नसाब’ होय. यवतमाळ जिल्ह्याला नक्षलग्रस्त, आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या याच यवतमाळ जिल्ह्याने याच जिल्ह्यातील बंजारा समाजाने महाराष्ट्राला दोन माजी मुख्यमंत्री म्हणून हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक साहेब, कै. सुधाकररावजी नाईक साहेब, राज्यपाल म्हणून कै. सुधाकररावजी नाईक, मा. मनोहरराव नाईक अन्न व शिक्षण मंत्री, संजयभाऊ राठोड वनमंत्री, इत्यादी मंत्री दिलेत याचा आम्हास आज गौरव वाटतो.हे वाचा – आई-वडीलांनी आपल्यासाठी काय केलं.?बंजारा समाजातील तांड्यातील नायक, कारभारी, असामी व गावातील प्रतिष्ठीत नागरीक यांचा जमलेला एक प्रकारचा समन्वय म्हणजेच ‘नसाब’..! आपल्या तांड्यात कोणत्याही प्रकारचे छोटे...