आजपासून RBI चा मोठा निर्णय : चेक क्लिअरन्स त्याच दिवशी, ग्राहकांना थेट फायदा
आजपासून RBI चा मोठा निर्णय : चेक क्लिअरन्स त्याच दिवशी, ग्राहकांना थेट फायदामुंबई : बँकिंग सिस्टिममध्ये आजपासून मोठा बदल झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टिम लागू केली असून यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत चेक क्लिअर होण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असे. पण आता ही प्रतिक्षा संपली आहे.नव्या प्रणालीत कॉन्टिन्युअस चेक क्लिअरिंग मोड सुरू करण्यात आला आहे. यानुसार सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बँकेत जमा झालेले सर्व चेक तात्काळ स्कॅन करून त्यांची इमेज आणि डेटा क्लिअरिंग हाउसकडे पाठवला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संबंधित बँकेने त्या चेकची पुष्टी करणे आवश्यक असेल. मात्र वेळेत उत्तर दिले नाही तर तो चेक आपोआप क्लिअर झालेला मानला जाईल.या बदलामुळे ग्राहकांना चेक जमा केल्यानंतर पैसे त्याच दिवशी खात्यात जमा होत...

