Monday, October 27

Tag: #Ravan Dahan

रावण अर्ध्या संसदेपेक्षा हुशार – सिमी ग्रेवालची दसऱ्यादिवशी वादग्रस्त पोस्ट
News

रावण अर्ध्या संसदेपेक्षा हुशार – सिमी ग्रेवालची दसऱ्यादिवशी वादग्रस्त पोस्ट

मुंबई : दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण देशात वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून रावण दहन केला जातो. मात्र यावर्षी (२ ऑक्टोबर)च्या दसऱ्यादिवशी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सिमी ग्रेवालने केलेल्या सोशल मीडिया पोस्टने चांगलाच वाद पेटवला आहे.नेहमी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी सिमी ग्रेवालने तिच्या ‘X’ (माजी ट्विटर) हँडलवर रावणाचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लिहिले की,“प्रिय रावण, दरवर्षी या दिवशी आपण चांगल्याचा वाईटावर विजय झाल्याचा उत्सव साजरा करतो. पण तांत्रिकदृष्ट्या तुमच्या वर्तनाला ‘वाईट’ न म्हणता ‘थोडं खोडकर’ म्हणायला हवे. तुम्ही सीतेचे अपहरण केले होते, पण तिला सन्मान, निवारा, चांगले अन्न आणि अगदी महिला रक्षकही दिले होते. इतका सन्मान आजच्या समाजातही स्त्रियांना मिळत नाही.”सिमीने पुढे रावणाचे बुद्धिमत्तेचे कौतुक करत लिहिले की, “रावण अर्ध्या सं...