धनगर समाजाने आता ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व घ्यावे – प्रकाश आंबेडकर
धनगर समाजाने आता ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व घ्यावे – प्रकाश आंबेडकरजालना : महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी आता निर्णायक लढ्याची वेळ आली आहे आणि या लढ्याचे नेतृत्व धनगर समाजाने करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे महत्वाचे विधान केले असून, राज्याच्या राजकारणात या वक्तव्यामुळे नवा राजकीय भूचाल निर्माण झाला आहे.प्रकाश आंबेडकर म्हणाले, “ओबीसींना सध्या २७ टक्के आरक्षण आहे. मात्र तेलंगणा राज्यात हेच आरक्षण ६२ टक्क्यांपर्यंत नेले गेले आहे. तसाच प्रयोग महाराष्ट्रातही होऊ शकतो. पण त्यासाठी ओबीसी समाजाने सत्ता हाती घेतली पाहिजे. धनगर समाजाने आता पुढे येऊन ओबीसींच्या हक्कासाठी नेतृत्व घ्यावे आणि विधानसभेवर सत्ता मिळवून आरक्षण वाढवावे.”ते पुढे म्हणाले, “ओबी...
