जोतीराव फुले यांना काव्यमय अभिवादन | क्रांती, शिक्षण आणि समानतेचा संदेश | जयंती विशेष कविता
जोतीराव !
जोतीराव ,तुम्ही झुगारलेत गुलामगीरीचे बंधतोडलेत जातिभेदांचे साखळदंडआणि घातलात पाया स्त्रीशिक्षणाचा रूढी, परंपरांना तोडून
तुम्ही वंचितांचे, उपेक्षितांचे, शोषितांचे , अस्पृश्यांचे क्रांतिबा आणि क्रांतिमा होऊन ओढलात आसूड तत्कालीन व्यवस्थेवर
तुमच्या बंडानेच आज स्त्री घेतेय सर्वच क्षेत्रांत गगनचुंबी भरारीतुमचा वारसा चालवित बाबासाहेबांनीही त्याला कायद्याने बळकटी दिली
आज तुमची दूरदृष्टी दिसते सर्वांगीण विकासातूनम्हणून होतोय तुमचा जयजयकार सर्वच स्तरांतून
मात्र आम्ही कृतघ्न होऊ नयेत कधिहीतुमच्या परिवर्तनाशी -एवढंच वाटतय !
अरुण विघ्ने
(जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन )
● हे वाचा –आमची लक्ष्मी.!
https://youtu.be/ad2ZxSpDdTw...
