Sunday, October 26

Tag: #Marathi books

बालपणाची निरागसता जपणारी कलाकृती – चांदणभूल
Article

बालपणाची निरागसता जपणारी कलाकृती – चांदणभूल

बालपणाची निरागसता जपणारी कलाकृती – चांदणभूलनाशिकचे साहित्यिक विजयकुमार मिठे यांचा चांदणभूल हा ललित लेखसंग्रह नुकताच वाचनात आला. खरे तर या संग्रहाला ललितलेखन म्हणणे वावगे ठरेल कारण या संग्रहातील लेखन हे लेखकाच्या बालपणापासून तर साठी गाठण्यापर्यंतचा थोडक्यात प्रवास मांडला आहे त्यामुळे या संग्रहाला आत्मलेखन किंवा स्वानुभवलेखन किंवा आत्मचरित्र म्हणता येईल असे मला वाटते. चांदणभूल या कलाकृतीच्या मुखपृष्ठाकडे पाहिले की, प्रत्येकाला आपले बालपण आठवते, कधी आई सोबत, तर कधी आजी आजोबांसोबत तर कधी मामा मावशी सोबत चांदण्यारात्री आभाळाकडे बघून चांदण्या मोजायच्या आणि चंद्राच्या कला अनुभवायच्या इतकी उत्सुकता लागलेली असायची.चांदणभूल या कलाकृतीच्या मुखपृष्ठाचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की, माणसाच्या गत आयुष्याचे संदर्भ रेखाटले आहेत की काय असे वाटते. विजयकुमार मिठे यांच्या लेखनीची भाषा ग्रामीण...