क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले: समाजसुधारक आणि शिक्षणाचे जनक
क्रांतिसूर्य-महात्मा ज्योतिबा फुले
भारतात इंग्रजांची सत्ता दृढ झाली आणि इंग्रजी शिक्षणाच्या प्रवाहाबरोबर नवे विचार, नवीन कल्पना ,नवीन तत्वज्ञानाचा प्रसार झाला. पाश्चिमात्य विचार, आचार, संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली. बुध्दिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा,मानवता, राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली.भारताबाहेरील जगाची जाणीव सुशिक्षित तरुणांना झाली होती. फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेल्या स्वातंत्र्य ,समता, बंधुता या मूल्यांचे महत्त्व त्यांना पटले होते. त्यामुळे भारतीय समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक क्षेत्रात बदल होत होते.भारतीय समाजातील मागासलेपण वैचारिक दारिद्र्य, अंधश्रद्धा, जातीभेद, उच्चनीचतेच्या भ्रामक कल्पना दूर करण्यासाठी शिक्षण घेतलेले सुशिक्षित तरूणांनी आपल्या लेखनातून, प्रत्यक्ष कृतीतून ,संघटनांच्या माध्यमातून तत्कालीन भारतीय समाजात जनजागृती करण्यास सुरुवात केली. या अ...
