चिखल्याचा एकनाथ वाघ : टिन पत्र्याच्या घरातून थेट हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
चिखल्याचा एकनाथ वाघ : टिन पत्र्याच्या घरातून थेट हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा प्रेरणादायी प्रवासबुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या चिखला गावाचा गरिबाघरचा मुलगा आता जगप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापिठात शिकायला जाणार आहे. या तरुणाचं नाव आहे एकनाथ भगवान वाघ.एकनाथची कहाणी जिद्दीची आहे. स्वप्नांचा पाठलाग करणारी आहे. आई कासाबाई आणि वडील भगवानराव अडानी. घरी शिक्षणाचा कसलाच वारसा नाही. टिन पत्र्याचं घर. आजारी आई. पण एकनाथ शिकत राहिला. ग्रामीण भागातील एका साध्या कष्टकरी कुटुंबातून हार्वर्ड विद्यापीठापर्यंतचा त्याचा प्रवास साऱ्या तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे. हावर्ड विद्यापीठामध्ये पब्लिक पॉलिसी या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासासाठी त्यास प्रवेश मिळाला आहे. विशेष हे की यासाठी त्याला महाराष्ट्र सरकारची परदेशी शिक्षणाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. महाराष्ट्रातून मोजक्याच विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाच...
