Monday, October 27

Tag: #Climate Change

प्रिय वसुंधरा…! निसर्गाच्या वेदनेतून उमटलेले अंत:करणस्पर्शी पत्र
Article

प्रिय वसुंधरा…! निसर्गाच्या वेदनेतून उमटलेले अंत:करणस्पर्शी पत्र

प्रिय वसुंधरा…! निसर्गाच्या वेदनेतून उमटलेले अंत:करणस्पर्शी पत्रप्रिय वसुंधरा…!तुझे पत्र मिळाले.वाचून मी खरेच अंतर्मुख झालो.तुझ्यावर आणि तुझ्या लेकरांवर, माझ्याकडून कळत..नकळत झालेल्या अन्यायाबद्दल मी तुझी माफी मागतो…पण का गं प्रिये…मी हा जो उच्छाद मांडला म्हणतेस त्याला फक्त मी एकटाच जबाबदार आहे का..?तुझं नि माझं नातं तर अगदीच प्राचीन…विश्वाची उत्पत्ती झाल्यापासून आपण एकमेकांचे सहचर…एकमेकांना जिवापाड जपणारे…तुझ्या अस्तित्वाला चैतन्य देण्याचं काम हजारो..लाखो वर्षे करत आलो आहे.!पण मी का क्रोधित आहे…माहीत आहे…? अगं ज्यांना तू आपली प्रिय लेकरं मानते,त्या तुझ्या दिवट्यांनी विकासाच्या नावाखाली जो हैदोस घातला आहे ना तो मला उघड्या डोळ्यांनी बघवत नाही.पहिल्यांदा त्यांनी कधी शेतीच्या, कधी वस्तीच्या तर कधी औद्योगिकीकरणाच्या नावाखाली तुझे हिरवेगार वस्त्र काढून तुला कुरूप करण्याचा प्रयत्न सु...