लष्करात नेमणूक, गावात मिरवणूक; नियुक्तीपत्र निघालं बनावट, गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरलं सावट!
लष्करात नेमणूक, गावात मिरवणूक; नियुक्तीपत्र निघालं बनावट, गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरलं सावट!लखनऊ : देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या एनसीसी कॅडेटच्या जीवनात अभिमानाचा क्षण काही तासच टिकला. लष्करात निवड झाल्याच्या आनंदात गावानं ढोल-ताशांसह मिरवणूक काढली, पण काही दिवसांतच त्या नियुक्तीपत्राचं खरं रूप समोर आलं आणि गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू सावटात बदललं.महाराजगंज जिल्ह्यातील डोमा गावातील नगमा ही बारावीतील विद्यार्थिनी आणि एनसीसी कॅडेट. देशसेवेत जाण्याचं तिचं स्वप्न होतं. एनसीसी प्रशिक्षणादरम्यान भेटलेल्या धीरज नावाच्या तरुणानं तिला लष्करात नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. “तुझं काम चांगलं आहे, मी तुला लष्करात भरती करून देईन,” असं सांगत त्यानं तिचा विश्वास संपादन केला.सप्टेंबर महिन्यात नगमाला गोरखपूरला बोलावण्यात आलं. तिथे तिला लष्करी गणवेश देण्यात आला, धावण्याची आणि वैद्यकीय चाचणी...
