Monday, October 27

Tag: #२०२६ निवडणुका

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार
News

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणार

दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल! जानेवारीत मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका, आचारसंहिता लांबणारमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर तीन टप्प्यांत घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने अंतिम टप्प्यात नेला आहे. यामध्ये मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.दिवाळीनंतर लगेच नोव्हेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यात निवडणुकीचा बिगुल वाजणार असून, त्यामुळे राज्यात राजकीय फटाक्यांची आतषबाजी सुरू होणार आहे. मात्र या निवडणुकीमुळे आचारसंहितेचा कालावधी मोठ्या प्रमाणात लांबणार असून, विकासकामांना फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.सर्वोच्च न्यायालयाचा आदेशमहापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दीर्घकाळ रखडलेल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ३१ ज...