Friday, November 14

Tag: होतं

मधमाशी चावल्यावर काय होतं?
Article

मधमाशी चावल्यावर काय होतं?

मधमाशी चावल्यावर काय होतं?डासांचा चावा असं म्हटलं जातं, पण मधमाशीचा असतो तो डंख. याचं कारण म्हणजे जेव्हा मधमाशी डसते तेव्हा ती एक विष आपल्या शरीरात सोडत असते. सहसा मधुपर्काच्या शोधात असलेली मधमाशी डंख करत नाही; पण ती तुडवली गेली आणि एखाद्या व्यक्ती पासून तिच्या पोळ्याला धोका आहे असं तिला जाणवलं तर मात्र त्वेषानं तुटून पडते.तरीही मधमाशी एकदाच डंख करू शकते, कारण डंख करण्यासाठी तिच्या अंगी जो एक सुई सारखा अवयव असतो, याला स्टिंग असंच म्हणतात तो तुटून आपल्या शरीरातच अडकून पडतो. खरंतर ही सुई साधी नसते. या सुईच्या दोन्ही बाजूला तिला जोडलेले दोन काटेरी पट्टे असतात. ते वर खाली होऊ शकतात. यातला एक पट्टा आपल्या कातडीत शिरून तिथे अडकून पडतो. त्यामुळे तो आणखी आत ओढला जाऊन सुईला आपल्या बरोबर ओढून नेतो. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूचा काटेरी पट्टा आपली हालचाल करू लागतो.असं करत ते सुईला कातडी पार करून ...
आमचं प्रेम होतं की नाही हे सांगता नाही येणार…!
Article

आमचं प्रेम होतं की नाही हे सांगता नाही येणार…!

आमचं प्रेम होतं की नाही हे सांगता नाही येणार, पण ती सुरूवातीची दोनेक वर्षे मला तिचं कमालीचं आकर्षण होतं. म्हणजे पहिल्यांदा तिला पाहिलं ना, तेव्हा मनात काय काय फिलिंग्स आल्या होत्या, हे सांगायला शब्द पण नाहीत. म्हणजे अगदी ती भेटायच्या अगोदर किती तरी वेळा तिचा माझ्या मोबाईल मध्ये असलेला फोटो मी पुन्हा पुन्हा बघायचो. भेट झाल्यावर तेव्हा आमचा सहवासही खूप होता.   तिच्याबरोबर कुठे आणि काय काय धमाल केली हे लिहायचं ठरवलं तर, एखादी दीर्घकथाच तयार होईल. ती सोबत असली की मला अगदी परिपूर्ण असल्याचं फिलिंग येत असे. कारण ती होतीच तशी.                   मला ती कायमच हवीहवीशी वाटायची. तिची सोबत खूप आनंद द्यायची. ती सोबत असली की, चारचौघांत रूबाबदारपणा यायचा. पण पुढे तिने स्वतःहून संबंध कमी केले. तिनं का असं केलं, समजलं नाही. माझ्यावर ती का नाराज झाली, कळले नाही. दर दिवसाआड होणारी आमची भेट महिना-दोन महिन्यात...